प्रहार माहिती अधिकार पत्रकार फाउंडेशन संचलित .
माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रात सध्या प्रत्येक जिल्ह्याला कार्यरत आहे या समितीच्या माध्यमातून समाजसेवा केली जाते यामध्ये मोठ्या संख्येने प्रिंट मीडिया पत्रकार सोशल मीडिया पत्रकार व डिजिटल मीडिया पत्रकार कार्यरत आहेत. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन न करता वापरणे हे प्रत्येकाच अधिकार आहे. समाज सेवा करत असताना जनसामान्यांना न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी आपल्या व्यथा समितीमार्फत मांडल्या जातात शासकीय अधिकाऱ्यांना त्रास कमी व्हावा, त्यांचा लोड कमी व्हावा, यासाठी समितीतील सर्व कार्यकर्ते काम करत असतात. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, माणसाने माणसाशी माणसासम वागणे या विचारसरणीला पुढे ठेवून, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती आपल्या कार्यास प्राधान्य देते. समाज सेवा करण्याची प्रबळ इच्छा आणि निर्भीड पणे पत्रकारिता करणाऱ्या प्रमाणिक पत्रकारांची ही एक समिती आहे. आमच्यासोबत काम करायचे असल्यास कृपया संपर्क करा. चला भ्रष्टाचार मुक्त, क्राईम मुक्त, भारत घडवूया!!!